कार्य

ध्यान केंद्र

दर रविवार सकाळी एक तासाची ध्यानाची बैठक स्वामी मकरंद नाथांसोबत होते. ध्यानानंतर स्वामी मकरंदनाथांचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन होते. तसेच काही रविवारी दोन तासांच्या दीर्घ ध्यानाच्या बैठकी देखील आयोजित केल्या जातात. नाम स्मरणाच्या बैठकींचे विशेष आयोजन केले जाते.

प्रवचने व विशेष केंद्रे

गणेश पूरम येथे स्वामी स्वरूपानंद रचित अभंग ज्ञानेश्वरीवर ज्येष्ठ साधकांचे निरुपण होते. तसेच विशेष केंद्रामध्ये साधक आपले परमार्थविषयक चिंतन प्रगत करतात. स्वामी स्मृती कार्यक्रमाअंतर्गत साधक स्वामी माधवनाथांच्या आठवणी कथन करतात.

सत्संग - पारमार्थिक प्रश्नोत्तरे

दर गुरुवारी सकाळी ८३० ते ९३० या वेळात गणेश पूरम येथे सत्संगाचा कार्यक्रम होतो. पु स्वामी मकरंद नाथ साधकांच्या पारमार्थिक प्रश्नांना समर्पक उत्तरे देतात. हा कार्यक्रम सर्वाना विशेष प्रिय आहे कारण साधनेतील शंकांचे समाधान सदगुरूंकडून होते व पुढील साधना निशंकपणे होण्यास मदत मिळते.

आनुषंगिक साधना

मुख्य ध्यान साधनेला पूरक अशा आनुषंगिक साधना स्वामी मकरंद नाथांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात. स्वामीजींनी आपल्या साधनाकालात हाताळलेल्या हे साधनेचे प्रकार साधकांना अतिशय भाऊन जातात.

युवा स्नेह

साधकांचे वयाप्रमाणे गट पाडून - १६ ते २५, २५ ते ३५, ३५ ते ५० व ५० वरील - त्यांच्या वयोगटांच्या साधना व चिंतन बैठकी होतात. यात सर्व युवा साधक उत्साहाने भाग घेतात. हे वयोगट युवा स्नेह हे विशेष कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांचे नियोजन युवांनीच केलेले असते. हे युवा केंद्रातील विविध सेवा कार्यातही सहभागी होतात.

विशेष कार्यक्रम व उत्सव

  • स्वामी मकरंद नाथ गुरुपौर्णिमा
  • अश्विन शुद्ध चतुर्थी - उत्तराधिकार प्रदान दिन
  • स्वामी मकरंद नाथ वर्धापन दिन
  • गुढी पाडवा , विजय दशमी, दिवाळी पाडवा - विशेष कार्यक्रम